Monday, 14 November 2011

ती

ती भेटणार होती म्हणून मी आलो कॉलेजला
ती ...

उठलो सकाळी मी, केला नमस्कार सूर्याला
प्रचंड झोप, होती  चिपाडेही डोळ्याला
तशातही नकळत फोन लागला हाताला
डोळे होते बंद तरीही कॉल लावला तिला

ती ..

म्हणाली मला, "आत्ताच उठलीये वेळ लागेल आवरायला
बोलायचं तुझ्याशी महत्वाचं, येतोस का कॉलेजला ?"
धस्स झालं हृदयात, विचार भिडला मनाला
चुकलं का काही माझं, गेलो हिला पटवायला ?

ती ..

पटकन आवरलं म्हणलं, " आई, जातोय कॉलेजला
वेळ लागेल यायला कदाचित, नको थांबूस जेवायला"
कसं सांगणार आईला, चित्त नव्हतं थाऱ्याला
वाटलं असं कि निघतोय, बोर्डाची परिक्षा द्यायला

ती ..

वाट पहात माझी ती बसली होती कॅन्टीनला
सिरीयस चेहरा पहिला तिचा, म्हणलं झालं तरी काय हिला ?
मी समोर बसल्यावर, शांतपणे लागली बोलायला
तडपत होतो मी तिचं स्मितहास्य पहायला

ती ..

काल मला प्रश्न विचारलास , वेळ दिलास विचार करायला
इतकं गोड तुझं विचारणं, भिडलं रे मनाला
बोलली ती इतकं, अन मिळाली शांतता माझ्या जिवाला
म्हणलं मनात , आता काय घेशील उत्तर ऐकवायला?

ती ..

"विचार करायची गरजच नव्हती", म्हणली ती मला
आपल्या पहिल्या भेटीपासूनच लागलास तू आवडायला
आवडेल सख्या मला सखी तुझी व्हायला
लाजली त्यावर ती इतकी छान कि शब्द नाहीत सांगायला

ती ..

म्हणलं तिला आत्तापर्यंत ओढ होती जिवाला
खूप गोड हसली आणि 'वेडा', म्हणाली ती मला
दिवस होता तो खूप सुंदर माझ्या आयुष्यातला
जणू काही वाळवंटात होता गुलमोहोर मोहरला

                                                            प्रसन्न
                                                            १२/०७/२००७




1 comment: