Wednesday 11 July 2012

मॅनेजरची लक्षणे

कार्यभाग साधोनि घ्यावा, असे बोलण्यात गोडवा 
तोचि मॅनेजर ओळखावा, अनुभवी तेथेचि जाणावा ||१||

संघाच्या वेळेचा मान ठेवा, करमणुकीस वाव हवा 
तोचि मॅनेजर ओळखावा, समंजस  तेथेचि जाणावा ||२||

सुट्टीचा अर्ज करावा, विनासायास मंजूर व्हावा
तोचि मॅनेजर ओळखावा , मित्र तेथेचि जाणावा ||३||

काल विपरीत यावा, मदतीचा हात मिळावा
तोचि मॅनेजर ओळखावा , बंधू तेथेचि जाणावा ||४||

चूक करिता रोष व्हावा, परी गुन्हा पोटात घालावा
तोचि मॅनेजर ओळखावा, माणूस तेथेचि जाणावा ||५||

दोन स्तरात वाद व्हावा, सुवर्णमध्य त्यात शोधावा
तोचि मॅनेजर ओळखावा, चतुर तेथेचि जाणावा ||६||

वेळ मारोनी न्यावा, प्रत्येक प्रश्न टोलवावा
तोचि मॅनेजर ओळखावा, शत्रू तेथेचि जाणावा ||७||

सामोरी आमिष ठेवा, नफा त्यातून कमवावा 
तोचि मॅनेजर ओळखावा, कपटी तेथेचि जाणावा ||८||

ऐसा असावा मॅनेजर, ज्याने सर्वांना तोष व्हावा 
तोचि मॅनेजर ओळखावा, देव तेथेचि जाणावा ||९||

प्रसन्न
११-०४-२०१२ 

No comments:

Post a Comment